एस.टी.चालकाची राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या

रावेर – लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गेल्या अनेक महिन्यांपासून संपकरी एस.टी.कर्मचारी विलीनीकरणाच्या प्रतिक्षेत असून मानसिक दडपणातून काही जण आत्महत्येचा पर्याय अवलंबत असल्याचे चित्र दिसून आले आहे. अशातच रावेर आगारातील एका संपकरी एस.टी.चालकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

रावेर आगारातील कन्हैया भिका अटकाळे या ४७ वर्षीय चालकाने यांनी शनिवार, दिनांक १२ रोजी रात्री नऊ वाजता राहत्या घरी आत्महत्या केली आहे. आपल्या घरातील छतास दोराच्या सहाय्याने त्याने गळफास घेतला.

गेल्या अनेक महिन्यांपासून सुरु असलेल्या एस.टी.कर्मचार्‍यांच्या संपात अटकाळे यांचा सहभाग होता त्यामुळे ते कामावर हजर नव्हते अशी माहिती रावेर येथील आगार प्रमुख बेंडकुळे यांनी दिली. त्यांच्या आत्महत्येचे करण्यामागचे नेमके अजून कारण समजू शकलेले नसून विशाल अटकाळे यांनी पोलीसात दिलेल्या खबरीवरून त्यांच्या अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास पोलीस हवालदार अर्जुन सोनवणे हे करीत आहेत.

Protected Content