जळगाव प्रतिनिधी । एस.एस.बी.टी अभियांत्रिकी महाविद्यालयात येथे गांडूळ खत प्रकल्पाचे उद्घाटन आज गुरूवार 19 डिसेंबर रोजी करण्यात आले.
महाविद्यालयातील जैविक कचर्याचे नियोजन करण्यासाठी या प्रकल्पाची मदत होणार आहे. या प्रकल्पातून निर्मित होणाऱ्या गांडूळ खताचा वापर महाविद्यालयातील वृक्ष संवर्धन तसेच बागकामासाठी करण्यात येण्याचे नियोजित आहे. अभियांत्रिकी महाविद्यालयातील “एनर्जी क्लब” च्या अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के एस वाणी, रासायनिक व जैवतंत्रज्ञान अभियांत्रिकी विभागाचे विभाग प्रमुख तसेच एनर्जी क्लब चे समन्वयक डॉ. व्ही.आर. डीवरे, एनर्जी क्लब चे सचिव प्रा. गौरव खोडपे, डॉ.एस.ए. ठाकूर, डॉ. एन.वाय. घारे, प्रा. व्ही.पी. सांगोरे, प्रा. जयंत पारपल्लीवार व प्रा. सारिका पवार उपस्थित होते. या प्रकल्पाच्या यशस्वीतेसाठी वीरेंद्र मोरे, चंद्रकांत बोरसे, जनार्दन अमोदकर, कांतीलाल पाटील, रविंद्र महाले व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.