जळगाव प्रतिनिधी । तालुक्यातील बांभोरी येथील एसएसबीटी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी दिल्ली येथे झालेल्या ऑल इंडिया मोमी हैकथॉन २०१९ या स्पर्धेत तिसरे पारितोषिक पटकाविले आहे.
या स्पर्धेसाठी पूर्ण भारतातून १४० अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचे संघ या स्पर्धेत सहभागी झाले होते. या स्पर्धेत यांनी विविध चुरशीच्या राउंड मध्ये चांगल्या पद्धतीने बाजी मारली पहिल्या फेरित कमाल इ – चार्जिंग चा वापर या शोधप्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले अणि अंतिम फेरित या शोधप्रकल्पाचे सादरीकरण व प्रश्नमंजुषा कार्यक्रम झाला. या विद्यार्थ्यांना तृतीय क्रमांकाचे पारितोषिक म्हणून रोख १०,००० रुपये व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. अमित पाटिल, हेमलता टाक, ऋतिक माहुरकर, खिलेश भंगाले, गौरी मूंदड़ा हे विद्यार्थी ह्या पुरस्काराचे मानकरी ठरले. या विद्यार्थ्यांचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. एस. वाणी, उपप्राचार्य डॉ. एस. पी. शेखावत यांनी तोंड भरून कौतुक केले तसेच विभाग प्रमुख डॉ. यु. एस. भदादे यांनी अभिनंदन केले व प्रा. एन. पी जगताप यांचे मार्गदर्शन लाभले तसेच विभागाच्या सर्व प्राध्यापकांनी त्यांचे अभिनंदन केले.