खेळामुळे माणूस औषधांपासून दूर राहतो – डॉ. सुधीर चौधरी

chopada karykram 1

चोपडा, प्रतिनिधी | खेळाडूच्या जीवनात निराशा येत नसते, खेळाडू कधीही आत्महत्या करत नाहीत. तरुणांनी मोबाईल, टी.व्ही. आणि व्यसनांपासून दूर राहावे.  नियमित खेळ आणि व्यायामामुळे शरीर अखेरपर्यंत तंदुरुस्त राहते. खेळामुळे माणूस औषधी आणि दवाखान्यापासून दूर असतो, असे सांगत निवृत्त क्रीडा शिक्षक डॉ. सुधीर चौधरी यांनी हॉकीचे जादूगार ध्यानचंद यांच्या जीवनातील अनेक रंजक किस्से सांगितले.

 

येथील महिला मंडळ माध्यमिक विद्यालयात क्रीडा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मंचावर चोपडा पंचायत समितीचे शिक्षण विस्तार अधिकारी सौमित्र अहिरे, केंद्रप्रमुख अशोक साळुंखे, मुख्याध्यापक सुनील चौधरी, पर्यवेक्षक दीपक शुक्ल, ज्येष्ठ शिक्षक सुनील पाटील, क्रीडा शिक्षक धर्मेंद्र मगरे हे उपस्थित होते. यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी सौमित्र अहिरे यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तत्पूर्वी मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन व फुटबॉलचे पूजन करण्यात आले. शिक्षक व्ही.पी. महाले यांनी मेजर ध्यानचंद यांच्या जीवनकार्याचा परिचय करून दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन संजय बारी यांनी केले.

Protected Content