मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । युनिक इंटरनॅशनल शाळेत चिमुकल्यांची क्रीडा स्पर्धेला उत्साहात सुरूवात करण्यात आली.
खेळ म्हणजे मुलांसाठी खूप आनंदाची गोष्ट. मुला मुलींनी रनिंग , बास्केट बॉल, बॉल कलेक्टिंग, वॉटर फिलिंग इन बॉटल, इत्यादी खेळ खेळून आनंद घेतला. “खेल की दुनिया मे पहिला कदम” या उक्तीप्रमाणे विद्यार्थ्यांनी आयुष्यात पहिल्यांदाच वेगवेगळे खेळ खेळले. आरोग्य हीच संपत्ती असे आपण नेहमी म्हणत असतो म्हणून मुलांना लहान वयातच वेगवेगळ्या खेळांची ओळख करून देणे महत्त्वाचे ठरले.प्रसंगी शाळेच्या सर्व शिक्षिका, मुख्याध्यापिका सौ. जयश्री मासुळे मॅडम, संस्थापक अध्यक्ष श्री मासुळे सर उपस्थित होते.