अमळनेर (प्रतिनिधी ) येथील प्रतिपंढरपूर म्हणून नावाजलेले श्री सद्गुरु सखाराम महाराज यांच्या व्दिशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या कार्यक्रमात अनेक राज्यातून अनेक संत महात्मे यांची उपस्थिती लाभणार आहे. व्दिशताब्दी वर्षानिमित्त तालुकास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा जी.एस हायस्कुल या स्पर्धांना सुरुवात करण्यात आली.
श्री.सदगुरु सखाराम महाराज व्दिशताब्दी समाधी सोहळा २०१८-१९ निमित्त क्रीडा स्पर्धा जी.एस हायस्कुल येथे सायंकाळी ६.३०वा. सुरु झाल्या. यावेळी मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून क्रीडास्पर्धांची सुरुवात झाली. स्पर्धेत १२ मुले, ४ मुलींच्या संघानी सहभाग घेतला. मुलांमध्ये प्रथम सेव्हन स्टार शिरसाळे, व्दितीय प्रताप कॉलेज , तृतीय के. डी. गायकवाड ,मुले—प्रथम -प्रताप कॉलेज , व्दितीय–पी.बी ए.स्कुल, तृतीय–भगिनी मंडळ यांनी विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचे प्रमुख प्रा. ए. के. अग्रवाल, सचिव महेश माळी, पंच म्हणुन एस पी वाघ ,डी. डी. राजपुत, एन. डी. विसपुते, संजय पाटील,श्री.करंजे ,के. आर. बाविस्कर, जे. व्हि. बाविस्कर, सुनिल करंदिकर, आर. पी. चौधरी, वंजारी , वेळाधिकारि प्रतिक बाविस्कर, गिरीष रोदळे, यांनी पाहिले.