यावल येथे जलशक्ती अभियानांतर्गत कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद

jal shakti abhiyan

यावल, प्रतिनिधी | यावल आणि रावेर या दोघा तालुक्यातील भू-गर्भातील पाण्याची पातळी गंभीर स्थितीत पोहोचली आहे. या परिस्थितीची दखल घेवुन जर आपण वेळीच जागृत झालो नाही तर येणाऱ्या काळात आपला परिसर वाळवंट होईल, अनावश्यक पाण्याच्या वापरामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. आविनाश ढाकणे यांनी येथे आयोजित जलशक्ती अभियानांतर्गत झालेल्या एक दिवसीय कार्यशाळाप्रसंगी केले.

 

यावलच्या धनश्री चित्र मंदिर सभागृहात आज (दि.१० ऑगस्ट) सकाळी ११.०० वाजता महसुल प्रशासनाच्या वतीने केन्द्र शासनाच्या महत्वकांक्षी जलशक्ती योजनेसंदर्भात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी उपस्थित मान्यवर सरपंच, उपसरपंच, मान्यवर पदाधिकारी शेतकरी यांना मार्गदर्शन करीत असतांना जिल्हाधिकारी डॉ. ढाकणे बोलत होते. त्यांनी सांगीतले की, आपणास जोपर्यंत अडचण निर्माण होत नाही, तोपर्यंत आपण कामे करत नसल्याचे सांगुन, कोल्हापुर, सांगली या जिल्ह्यात निर्माण झालेली पूर परिस्थिती त्याचाच परिणाम आहे. मराठवाडयातील इतर भागात अजुनही दुष्काळाची परिस्थिती आहे, असेही ते म्हणाले. रावेर आणि यावल या तालुक्यातील शेतकरी अत्यंत कष्टाळु असुन, या भागातले सरपंच असो, नगरसेवक असो, पंचायतचे सदस्य असो, ही मंडळी जमिनीवर काम करणारी असुन, यावल व रावेर तालुक्यांची जल शक्ती अभियांनासाठी निवड होणे, ही आपण सर्वांच्या दुष्टीने चिंतेचा विषय आहे.

आपण सर्वांनी राजकारणाच्या पलीकडे जावुन या लोकसहभागातुन जल शक्ती अभियानाची कामे करणे अत्यंत गरजे असल्याचे सांगुन, सुमारे २५ कोटी रुपयांची पाणलोट क्षेत्रासाठी कामे झाल्याची माहिती या वेळी कृषी शैक्षणीक संशोधन परिषदचे उपाध्यक्ष ना. हरीभाऊ जावळे यांनी दिली. दरम्यान ना. जावळे हे मार्गदर्शनपर आपले मनोगत व्यक्त करतांना जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे हे मोबाईलवर बोलत असतांना ना. जावळे यांनी आपण एवढया गंभीर व शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर विषयावर बोलत असतांना जिल्हाधिकारी हे मोबाईल बोलतांना दिसल्याने त्यांना चांगलेच सुनावले.

याप्रसंगी विनोद ढगे यांनी आपल्या सहकार्यांच्या माध्यमातुन शासनाच्या दुष्काळ परिस्थितीवर उपाय असलेल्या योजनांची माहिती आपल्या पथनाट्याच्या माध्यमातुन उत्कृष्ट सादरीकरण केले. या एकदिवसीय जलशक्ती अभियानांत खासदार रक्षाताई खडसे, ना. हरीभाऊ जावळे, चोपड्याचे आ. चंद्रकांत सोनवणे, जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हा परिषदचे सिईओ डॉ. बी.एन. पाटील, वन विभागाचे डीएफओ प्रकाश मोराणकर, कृषी विभागाचे, प्रांत अधिकारी डॉ. अजीत थोरबोले, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर अप्पा सोनवणे, रवीन्द्र पाटील, सौ. सविता भालेराव, पंचायत समितीच्या सभापती सौ. पल्लवी चौधरी, यावलच्या नगराध्यक्षा सौ. सुरेखा कोळी, पं.स. सदस्य योगेश भंगाळे, दिपक पाटील, यावल न.प.चे नुकतेच रुजु झालेले मुख्याधिकारी बबन तडवी, फैजपुर मुख्याधिकारी किशोर चव्हाण उपस्थित होते. तालुक्यातील सरपंच, शेतकरी, ग्राम पंचायत सदस्य मोठ्या संख्येने या कार्यशाळेत सहभागी झाले होते. या एकदिवसीय कार्यशाळेचे सुत्रसंचलन योगेश इंगळे यांनी केले तर आभार तहसीलदार जितेन्द्र कुवर यांनी मानले.

Protected Content