यावल, प्रतिनिधी | येथील अंगणवाडी कार्यालयात आज (दि.१९) सकाळी पल्स पोलिओ लसीकरण मोहीमच्या शुभारंभ पंचायत समीतीचे उपसभापती दीपक नामदेव पाटील यांच्याहस्ते आयुष चद्रंशेखर पाटील या बालकास पल्स पोलिओची डोस पाजून शुभांरभ करण्यात आला.
यावेळी आशा स्वयंमसेविका सौ रंजना कोळी, रंजना पाटील, आलकाबाई ईंधाटे, ज्योती ईंधाटे, माजी ग्रामपंचायत सदस्य उदयसिंग पाटील, ग्रामपंचायत कर्मचारी गणेश पाटील, पञकार गोकुळ तायडे यांच्यासह ग्रामथ उपस्थीत होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. हेमंत बह्राटे यांच्या मार्गदर्शनाखाली साकळी प्राथमिक आरोग्य केन्दाचे डॉ. सागर पाटील, आरोग्य सेवक कडु तायडे, संजय पारधी, औषध निर्मात पी.टी.ढाके, आरोग्य सेविका पी. डी. चौधरी, सौ. सविता कोळी, वाहन चालक शेख सोयब, यांनी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परीश्रम घेतले.
याशिवाय तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय, हिंगोणा प्राथमिक आरोग्य केन्द्र, भालोद प्राथमिक् आरोग्य केन्द्र, पाडळसे प्राथमिक आरोग्य केन्द्र, सावखेडा सिम प्राथमिक आरोग्य केन्द्र, किनगाव प्राथमिक आरोग्य केन्द्र आणि ग्रामीण रुग्णालय न्हावी तालुका यावल या ठिकाणी देखील पल्स पोलिओ मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली. या मोहीमेस यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमन्त बऱ्हाटे यांच्या मार्गदर्शनाखाली हिंगोणा वैद्यकीय अधिकारी डॉ.फिरोज तडवी, साकळी डॉ.सागर पाटील, सावखेडा सिमचे डॉ. भोईटे, न्हावी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.पाटील, यावल ग्रामीण रुग्णालयाचे डॉ.बी.बी. पावरा, वैद्यकीय अधिकारी ठाकुर, डॉ.शारदा महाजन यांनी परिश्रम घेतले.