जळगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जागतिक योग दिनाच्या निमित्ताने 21 जून रोजी जिल्हाभरात योग दिन वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात आला याच अनुषंगाने महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या जिल्हा कार्यकारणी व सदस्यांनी जागतिक योग दिन वेगवेगळ्या ठिकाणी योगासनाचे प्रात्यक्षिके घेऊन साजरा केला आहे दरम्यान संघटनेच्या 27 योग शिक्षकांनी वेगवेगळ्या विद्यापीठ महाविद्यालय शाळा संस्था या सर इतर ठिकठिकाणी योग दिनाचे महत्त्व पटवून देतात योगातील आसन प्राणायाम आणि सूर्यनमस्कार यांची माहिती उपस्थित त्यांना देण्यात आली. या योग कार्यक्रमाला आयोजकांकडून उस्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले.
यात महाराष्ट्र योगशिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील गुरव यांनी मेहरून तलाव येथील रायसोनी फार्म हाऊस आणि संत बाबा हरदास मल मंगल कार्यालय येथे प्रात्यक्षिक घेऊन उपस्थिताकडून योगा वर्ग घेण्यात आला. पुढील कार्यकारणीतील योगशिक्षक यांची नावे आणि कंसात योग प्रात्यक्षिक घेतल्याचे ठिकाण याप्रमाणे आहे.
पांडुरग सोनार (पी. एम. मुंदडे हायस्कूल, पिंप्राळा, के. सी. इंग्लीश मेडियम स्कूल, पिंप्राळा), श्वेता लोहिया व भाग्यश्री पाटिल (कन्या स्कूल, जळगाव),
श्वेता लोहिया, योगिता जगताप, भाग्यश्री पाटिल-
(मातोश्री वृद्धाश्रम, जळगाव), डॉ. शरयू विसपुते (सेंट जोसेफ स्कूल आणि विवेकानंद स्कूल), राकेश शिरसाठे व रश्मी शिरसाठे (संत निरंकारी मंडळ शिरसोली), जयश्री भंगाळे (नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय), डॉ. प्राची सोनार (रोझलँड इंग्लिश मीडियम स्कूल), प्रांजल देवकर, चैत्राली सैंदाणे आणि योगिता जगताप (विवेकानंद स्कूल), हेमांगिनी सोनवणे (गांधी उद्यान, हनुमान मंदिर, गणेश कॉलनी), दीपाली कोल्हे (एल एच इंग्लिश मीडियम स्कूल, का.ऊ. कोल्हे विद्यालय), ॲड. स्वाती निकम (लेवा भवन, बेंडाळे महाविद्यालय, खुबचंद सागरमल विद्यालय आणि सबजेल), प्रा. कृणाल महाजन (कविकुलगुरू कालिदास संस्कृत विश्वविद्यालय, रामटेक, नागपूर), स्मिता बुरकुल
(अनुभुती स्कूल, जळगाव), अर्चना सुनील गुरव (लाॅयन्स सेन्ट्रल क्लब नेहरू नगर), नेहा सुभाष तळेले ( बालनिकेतन शाळा, SNDT महिला महाविद्यालय), वैशाली दिनकर भारंबे (जिजामाता माध्यमिक विद्यालय आणि गुरवर्य परशुराम विठोबा पाटील विद्यालय), अरूणा लढ्ढा (शकुंतला राणे प्राथमिक विद्यालय), कविता अतुल चौधरी (म हाराणा प्रताप हायस्कूल आणि एमआयडीसी), चित्रा महाजन (आनंद योग सेंटर, काशिनाथ पलोद स्कूल, भा. का.लाठी स्कुल), सोनाली पाटील (
सरजुबाई नंदलाल झंवर विद्यालय, पाळधी), निलिमा लोखंडे (या.दे. पाटील स्कूल, मेहरूण,
भिलाभाऊ गोटु सोनवणे स्कूल मोहाडी), रोहन चौधरी (पु. ना. गाडगीळ, मेरीको कंपनी एमआयडीसी आणि आर.आर. स्कूल), प्रिया दारा (
बाबा हरदासराम मंगल कार्यालय, कानडा आदर्श स्कूल), अरविंद सापकर (हेड पोस्ट ऑफीस), सुभाषजी जाखेटे (जैन इरिगेशन बांभोरी), रत्नप्रभा चौधरी (पु.ना.गाडगीळ, लेडिज आयटीआय)