जळगाव शहरातील ८९८१ विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला दिली भेट
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । महाराष्ट्र पोलीस स्थापना दिनानिमित्त जळगाव जिल्हा पोलीस दल, भंवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशन व युवाशक्ती फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या मैदानात सोमवार ८ जानेवारी २०२४ रोजी शस्त्र, श्वान, बॉम्ब शोधक व नाशक, पोलीस बॅन्ड, वायरलेस इत्यादींचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रदर्शनाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता हवेत तिरंगे फुगे सोडून जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधिक्षक अशोक नखाते यांचे हस्ते सोडून करण्यात आले. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया, प्रितम शिंदे, मूळजी जेठा महाविद्यालयाचे प्राचार्य एस. एन. भारंबे आदी मान्यवर उपस्थित होते.
विविध शाळा महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. यासह एन.सी.सी. व एन.एस.एस. चे कॅडेट सुद्धा उपस्थित होते. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. संदिप गावित यांनी प्रास्ताविक करून महाराष्ट्र पोलीस स्थापना दिवसाचा इतिहास मांडला तर आभार प्रदर्शन प्रो. उपेंद्र केसुर यांनी केले. युवाशक्ती फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष विराज कावडीया यांनी आयोजना मागची भूमिका स्पष्ट केली. पोलीस विभाग व नागरिकांमध्ये सम्न्वय व संवाद वाढावा तसेच विद्यार्थ्यांना पोलीस विभागातातील संपूर्ण माहिती मिळावी यासाठी आयोजन केल्याचे कावडीयांनी सांगितले. सूत्रसंचालन सहाय्यक फौजदार देविदास वाघ यांनी केले.
यावेळी जळगाव शहरातील सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी यामध्ये राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलीस निरीक्षक महेश शर्मा, रंगनाथ धारबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक विठ्ठल पाटील, बॉम्ब शोधक व नाशक पथकचे प्रभारी अधिकारी अमोल कवळे, राखीव पोलीस उपनिरीक्षक रामेश्वर साळंके, मंगल पवार, बिनतारी संदेश विभागाचे एम. जी. पाटील, सहाय्यक फौजदार एन. एम. शेख, एन.सी.सी.चे कॅप्टन योगेश बोरसे उपस्थित होते.
प्रदर्शनात एके 47, एसएलआर रायफल, कारबाईन 9एमएम, अश्रुधूर साठा, पम्प अॅक्शन, 9एमएम पिस्टल, ग्लॉक पिस्टल, रिव्हॉलर, श्वान पथकातील डॉबरमॅन व लॅबेडर प्रजातीचे श्वान, वायरलेस प्रणाली, दंगानियंत्रण पथकातील कमांडो, इन्सास रायफल आदी पोलीस हाताळत असलेले शस्त्र व यंत्रणेचे प्रदर्शनात समावेश होते. पोलीस प्रशिक्षक सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, पोलीस हवालदार आशिष चौधरी, अनिल तडवी, संदिप पवार, रजाक सैय्यद, सुभाष हिरबक्षी, दिपक पाटील यांनी उपस्थित नागरिकांना व विद्यार्थ्यांना उपरोक्त शस्त्रांची संपूर्ण माहिती दिली. जळगाव शहरातील ८९८१ विद्यार्थी व नागरिकांनी प्रदर्शनाला भेट दिली. सुरक्षीततेच्या दृष्टीकोनातून प्रदर्शनात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, सहाय्यक फौजदार देविदास वाघ, राजेश वाघ, सोपानदेव पाटील, युवाशक्ती फाऊंडेशनचे प्रितम शिंदे, प्रशांत वाणी, यश राठोड, तन्मय मनोरे, तृषांत तिवारी, ओम पाटील, पियुष हसवाल, सुरज परदेशी, ओम चौधरी, गणेश बारी, राहूल चव्हाण, मयुर आमोदकर, तुषार पाटील आदींनी परिश्रम घेतले.