जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात विकी टेलर चौकातील खानावळीत विनापरवाना देशी विदेशी दारूचा साठा करून ओळखीच्या गिऱ्हाईकांना विक्री करणाऱ्या एकावर शनीपेठ पोलीसांनी गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारी कारवाई करत अटक केली आहे. त्यांच्याकडून ३१ हजार ८०० रूपयांचा दारूचा साठा जप्त केला असून शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक असे की, जळगाव शहरातील जोशी पेठ परिसरात विकी टेलर चौकातील खानावळीत विनापरवाना देशी विदेशी दारूचा साठा करून ओळखीच्या गिऱ्हाईकांना विक्री होत असल्याची गोपनिय माहिती शनीपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सुचना दिल्या. पोलीसांनी गुरूवारी १७ ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास कारवाई करत संशयित आरोपी सनत अनिल घोरूल वय ५५ रा. जोशीपेठ, सिताराम प्लाझा, जळगाव याला ताब्यात घेतले. त्यांच्याकडून ३१ हजार ८०० रूपये किंमतीच्या देशी विदेशी दारूचा साठा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीन पाटील, सहाय्यक फौजदार परीष जाधव, योगेश माळी, विकी इंगळे, गणेश ढाकणे, अमोल वंजारी यांनी कारवाई केली आहे.पुढील तपास पोहेकॉ योगेश माळी हे करीत आहे.