धक्कादायकच : प्रेयसीनं प्रियकराचा प्रायव्हेट पार्टच कापला; कारण…

ललितपूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । उत्तर प्रदेशच्या ललितपूरमधून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे एका प्रेयसीनं चक्क आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट चाकूनं कापला.

रविवारी ७ जानेवारी रोजी सकाळी ही प्रेयसी काही लोकांना घेऊन प्रियकराच्या घरी पोहोचली. तिथे तिने प्रियकरावर हल्ला करत त्याचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापला. तरुणाने आरडाओरडा केल्यानंतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले. सध्या तरुणाची प्रकृती गंभीर आहे. तरुणीचे या तरुणावर खूप प्रेम होते. तिला त्याच्याशी लग्न करायचं होते. मात्र तरुणाने लग्नाला नकार दिल्यानं तरुणीने हे पाऊल उचलले आहे.

यातील तरुण आणि तरुणी मजूर म्हणून राजस्थानला गेले होते. तेथे दोघांची मैत्री झाली. काही दिवसांनी दोघंही एकत्र राहू लागले. मुलीचं त्या तरुणावर खूप प्रेम होते. तिला तरुणाशी लग्न करायचं होतं. काही दिवसांपूर्वी दोघंही आपापल्या गावी परतले. येथे आल्यानंतरही दोघांचं बोलणं सुरूच होतं. मात्र काही काळानंतर तरुणानं तिला टाळायला सांगितलं होतं.

या सर्व प्रकारानं तरुणी अस्वस्थ झाली. तिनं तिच्या प्रियकराला लग्नाचा प्रस्ताव ठेवला. तेव्हा त्यानं लग्नाला साफ नकार दिला. याचा तिला राग आला. रविवारी पहाटे चार वाजता ती काही लोकांसह प्रियकराच्या घरी पोहोचली. तिनं त्यांच्या मदतीने तरुणाला पकडले. यानंतर तरुणीनं आपल्या प्रियकराचा प्रायव्हेट पार्ट चाकूने कापून पळून गेली. यानंतर तरुणाला रक्तस्त्राव आणि वेदना सुरू झाल्या. त्याचा आवाज ऐकून कुटुंबातील लोक जागे झाले.

Protected Content