सुरत-वृत्तसंस्था | एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे तब्बल २९ आमदार फुटले असून यात जिल्ह्यातील तीन आमदार आणि मंत्र्यांचा समावेश असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
एकनाथ शिंदे यांच्यासोबत आता एकूण २९ आमदार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत टिव्ही नाईन या वाहिनीने वृत्त दिले आहे. यात जिल्ह्यातील चंद्रकांत पाटील, लता सोनवणे आणि किशोर पाटील यांचा देखील समावेश असल्याचे यात म्हटले आहे.
उर्वरित मंत्र्यांमध्ये शंभुराज देसाई, अब्दुल सत्तार आणि संदीपान भुमरे यांचा देखील यात समावेश असल्याचे या वृत्तांत म्हटले आहे. या संदर्भात अद्यापही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर या संदर्भात ना. गुलाबराव पाटील यांच्याशी संपर्क केला असता तो झाला नाही. तर, लताताई सोनवणे या कामानिमित्त बाहेर असल्याची माहिती समोर आली आहे. सदर तीन आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती मिळाल्याने गोंधळ उडाला होता. मात्र चंद्रकांत पाटील व लताताई सोनवणे नव्हे तर जिल्ह्यातून फक्त किशोरआप्पा पाटील हेच एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याची माहिती एक तासाने समोर आली आहे.