Home Cities जळगाव गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक सोहळा : संत गोदडीवाले बाबा मंदिरात भाविकांची गर्दी

गुरुपौर्णिमेचा आध्यात्मिक सोहळा : संत गोदडीवाले बाबा मंदिरात भाविकांची गर्दी

0
195

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर शहरातील संत कवरराम नगर येथील सेवा मंडळाच्या वतीने संत बाबा गोदडीवाले बाबा मंदिरात आज, गुरुवारी १० जुलै रोजी उत्साहात गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. सकाळपासूनच मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.

यावेळी मंदिरात भजन-कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भाविकांनी भजनात आणि कीर्तनात मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. भक्तीमय वातावरणात भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत होता. भजन-कीर्तनाने मंदिराचा परिसर दुमदुमून गेला होता. गुरुपौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आलेल्या भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठीही भाविकांनी रांगा लावल्या होत्या. संत गोदडीवाले बाबा यांच्या प्रती असलेली श्रद्धा आणि गुरुपौर्णिमेचा आनंद यातून स्पष्ट दिसत होता. सेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.


Protected Content

Play sound