खामगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील खामगाव येथे इंडियन मेडिकल असोसिएशन व सामान्य रुग्णालय यांच्या वतीने महिलांसाठी जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने विशेष लसीकरण मोहीम राबविण्यात आली असून यावेळी कोरोना आजारावरील उपायोजना संदर्भात महिलांना मार्गदर्शन करण्यात आले.
महामारी असलेल्या कोरोनाच्या रुग्णांना सेवा देणाऱ्या परिचारिका व सांभदित महिला कर्मचारी महिलांचा या वेळी सेवानिवृत्त आरोग्य अधिकारी डॉ सौ सुरेखा मेंढे,महिला दक्षता समिती शिवाजी नगर पोलीस स्टेशन खामगाव अधक्ष्या सौ स्वाती गजानन कुलकर्णी यांचे हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी खामगाव सामान्य रुग्णालया चे निवासी वैद्यकीय अधीक्षक डॉ निलेश टापरे, डॉ सुषमा सरोदे ,डॉ समृध्दी मेंढे ,डॉ सौ सुमित्रा ताई राऊत ,राजश्री ताई पाटील,डॉ सौ कलंत्री, सुमनताई म्हात्रे हे प्रमुख उपस्थित होते या मोहिमेत खामगाव येथे 146 ज्येष्ठ नागरिक महिलांना लसीकरण करण्यात आले इंडियन मेडिकल असोसिएशनच्या महिला शाखेकडून हा राष्ट्रीय कार्यक्रम यशस्वी पणे जागतिक महिला दिनानिमित्त राबविण्यात आला