Home Cities अमळनेर अमळनेरला विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

अमळनेरला विकासकामांसाठी दोन कोटींचा निधी मंजूर

0
41

आ. शिरीष चौधरींचे प्रयत्न, सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे होणार काम

अमळनेर प्रतिनिधी । अमळनेर येथील नगरपालिका क्षेत्रात शहरवासीयांच्या सोयीसाठी आमदार शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नामुळे नगरविकास विभाग सन २०१९ साठी सुमारे २ कोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

शहरातील विविध प्रभागातील रस्त्यांची दुरावस्था पाहता आमदार शिरीषदादा मित्र परिवार आघाडीच्या नगरसेवकांनी आ चौधरी यांच्याकडे व्यथा मांडून रस्त्यांच्या समस्या निदर्शनास आणून दिल्या होत्या. त्या अनुषंगाने आमदार शिरीष चौधरी यांनी तात्काळ शासनाकडे मागणी करून नगरविकास विभागाच्या अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून २ कोटी निधी मंजूर करून घेतला , उर्वरित निधी देखील टप्प्याटप्प्यात मंजूर होणार असल्याची माहिती आ. शिरीष दादा मित्र परिवार आघाडीचे न.पा.चे गटनेते प्रविण पाठक यांनी दिली.

दरम्यान शहरातील नागरीकांना विशेष सुविधा पुरविण्यासाठी वारंवार मागणी करून देखील नगरपरिषदे कडून सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याची बाब आमदार चौधरी यांनी लक्षात घेऊन हा निधी प्राप्त केला असून यातून रस्त्यांची कामे मार्गी लागणार आहे. यामुळे आमच्या जनहिताच्या मागण्यांकडे पालिकेतील सत्ताधारी दुजाभाव करून दुर्लक्ष करीत असले तरी कार्यसम्राट आमदार शिरीष चौधरी आमच्या पाठीशी असल्याने प्रभागाच्या विकासात आम्ही कुठेच कमी न पडता उलट सत्ताधारी मंडळींपेक्षा अग्रेसर राहू अशी भावना प्रविण पाठक यांनी व्यक्त केली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound