जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे हेल्मेट जनजागृतीसाठी विशेष रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव जिल्हा पोलीस दल आणि शहर वाहतूक शाखेच्या वतीने आज सकाळी हेल्मेट जनजागृतीसाठी विशेष रॅलीचे आयोजन करण्यात आले. रॅलीत जळगाव शहराचे आमदार राजू मामा भोळे, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अशोक नखाते, विभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, आणि पोलीस विभागातील अधिकारी-कर्मचारी यांनी सहभाग घेतला.

रॅलीची सुरुवात जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातून झाली. यानंतर नवीन बस स्थानक, कोर्ट चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चित्रा चौक, अजिंठा चौफुली, आकाशवाणी चौक, स्वातंत्र्य चौक या मार्गाने मार्गक्रमण करून रॅलीचा समारोप पुन्हा जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या आवारात करण्यात आला.

हेल्मेट वापरासंदर्भातील जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या या रॅलीला जळगावकर नागरिकांनी भरभरून प्रतिसाद दिला. यामुळे नागरिकांमध्ये वाहतूक नियमांचे पालन आणि हेल्मेटच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढल्याचे पाहायला मिळाले.

Protected Content