अमळनेर प्रतिनिधी- विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांनी विशेष पथक नियुक्त करून अमळनेर शहरात छापे टाकून धडक कारवाई केली.
विशेष पोलीस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर यांना मिळालेल्या गुप्त माहिती नुसार त्यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन जाधव , पोलीस उपनिरीक्षक संदीप पाटील , राजेंद्र सोनवणे , विश्वेश हजारे , दीपक ठाकूर , सुरेंद्र टोंगरे , अमोल भामरे यांचे पथक तयार करून अमळनेर येथे पाठवून कारवाई करण्यात आली. यात तब्बल तीन ठिकाणी पथकाने छापे टाकले. जुने पोलीस निवासस्थान व बसस्थानक यांच्या मधल्या गांधीनगर नावाच्या गल्लीत संताजी सोडा सेंटर वर छापा टाकला असता तेथे अजय चौधरी , विनोद पाटील , विश्वास पाटील , मोहन सैंदाने ,दिनेश चौधरी , नारायण कोळी , शैलेश बाविस्कर , दीपक कोळी , विजय बडगुजर , वसंत कोळी हे सट्टा जुगार खेळताना , आकडे लिहिताना आढळून आले. त्यांच्याजवळून दोन मोटारसायकली सह ८० हजार ८५ रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. यानंतर हॉटेल सुयश जवळ एक ठिकाणी हिरामण सोनू ठाकरे , राहुल शिंगाणे , बापू भोई ,दत्तात्रय वारुळे , संजय निकम ,
रमेश अहिरे हे देखील सट्टा जुगार खेळताना आढळून आले. यानंतर आठवडे बाजारात लाल बाग शॉपिंग कॉम्प्लेक्स मध्ये छापा टाकून भूषण चौगुले , संजय सूर्यवंशी , दिवाकर ठाकूर धनराज कोळी , सुखदेव ठाकूर , मोतीराम कलोसे , जयसिंग वंजारी , आत्माराम बागुल , मुकेश भिल , इब्राहिम मेवती , प्रकाश मोरे , रवींद्र पवार , रवींद्र अहिरे , विनायक पाटील , झाकीर पठाण , शाम परदेशी , अशोक अहिरे , रामकृष्ण पाटील, मल्हारी कोळी , वासुदेव पाथरवड यांना अटक करण्यात आली. या कारवाईत एकूण ३ लाख १६ हजार ३१५ रुपयांचा ऐवज जप्त करून ३६ जणांविरुद्ध जुगार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला सर्वाना अटक करण्यात आली आहे.