चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जलशक्ती अभियान प्रभावी राबविण्यासाठी आज सकाळी तालुक्यातील चैतन्य तांडा येथे नवनियुक्त सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली.
महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत जलशक्ती अभियान प्रभावीपणे राबविण्याबाबत गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी तालुक्यातील ग्रामपंचायतींना लेखी सुचना दिल्या आहेत. त्याअनुषंगाने तालुक्यातील चैतन्य तांडा ग्रामपंचायतीत मंगळवार रोजी सकाळी ९ वाजता विशेष ग्रामसभा सरपंच अनिता राठोड यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली. या सभेत जल साधारण, पारंपारिक पद्धतीने रेन वॉटर हार्वेस्टिंग, जलस्रोतांचे नूतनीकरण, पाण्याचे पुनर्वापर, पाणलोटचा विकास, वृक्षरोपण, शेततळ्याच्या साहाय्याने प्रत्येक शेतीला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ करण्याचा या विशेष सभेत ठरविण्यात आले आहे. त्याचबरोबर गावात नाला खोलीकरणाची कामे झाली आहेत. तसेच सौचखड्डे देखील. त्यामुळे पाऊसाचा पडणारा एक एक थेंब जमीनीत जिरावा यासाठी उपाययोजना ग्रामपंचायत करणार असल्याचे सरपंच अनिता राठोड यांनी सांगितले आहे. तत्पूर्वी ग्रामसभेत वाचन ग्रामसेवक भाऊसाहेब जाधव यांनी केले.
याप्रसंगी माजी चेअरमन दिनकर राठोड, उपसरपंच आनंद राठोड, सदस्य अनिता चव्हाण, ग्रामस्थ मुद्दल पवार, धर्मा जाधव, भीमा राठोड, सुनील राठोड, ईश्वर चव्हाण, भारती चव्हाण, रमली राठोड, सुनंदा राठोड, छायाबाई राठोड, दुर्गाबाई जाधव, भारती चव्हाण, सुरेखा चव्हाण, राजेश राठोड, पंडित चव्हाण, किसन चव्हाण, बंकट राठोड, गणपत जाधव, ईश्वर चव्हाण, जलसेवक राहुल राठोड, पंकज राठोड व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.