भुसावळ प्रतिनिधी । मध्य रेल्वेच्या विशेष तपासणीच्या अंतर्गत आज रावेर रेल्वे स्थानकांवर सर्व गाड्यांना थांबवून विना तिकिट प्रवास करणार्यांकडून दंड वसूल करण्यात आला.
याबाबत वृत्त असे की, मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाचे वरिष्ठ वाणिज्य प्रबंधक आर.के. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि वाणज्य प्रबंधक अजय कुमार यांच्या उपस्थितीत आज रावेर रेल्वे स्थानकावर विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यात तिकिट तपासनीसांची ३६ तर रेल्वे सुरक्षा दलाच्या १० पथकांनी भाग घेतला. याच्या अंतर्गत गाड़ी क्रमांक ११०७८ झेलम एक्सप्रेस, सचखंड एक्सप्रेस, १२७८० गोवा एक्सप्रेस , ११०५६ गोदान एक्सप्रेस , १५०१८ काशी एक्सप्रेस, १२३३५ भागलपुर एक्सप्रेस , १५०६५ गोरखपुर- पनवेल एक्सप्रेस ,१२५३३ पुष्पक एक्सप्रेस, १२६२८ कर्नाटका एक्सप्रेस, १३२०२ जनता एक्सप्रेस, ११०१५ कुशीनगर एक्सप्रेस, ११०५७ पठानकोट एक्सप्रेस , ११०९३ महानगरी एक्सप्रेस, १२१६७ वाराणसी एक्सप्रेस, ११०६७ साकेत एक्सप्रेस आदी रेल्वे गाड्यांना रावेर रेल्वे स्थानकावर थांबवून यातील प्रवाशांची कसून तिकिट तपासणी करण्यात आली.
या तपासणीमध्ये ७२७ प्रवाशी विना तिकिट प्रवास करतांना आढळून आले असून त्यांच्या कडून तब्बल ३, ९२,१२० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर यासोबत १२५ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. या तपासणीत बेकायदा पार्सलसाठी २२०० रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. या मोहिमेमध्ये मुख्य तिकीट निरीक्षक हरविंदर अहलुवालिया यांच्यासह एन. पी. पवार, बी. एस. महाजन, व्ही. डी. पाठक, वि के. संचन, हेमंत सावकारे, एस. ए. दहीभाते, एस. एन. चौधरी, धीरज कुमार, पी. व्ही. ठाकूर ,एम के श्रीवास्तव, राजेंद्र प्रसाद, ए. एस. गायकवाड, पी. के. चतुर्वेदी, ए. के. गुप्ता, दीपक शर्मा, पी. एम. पाटील, एम. के. राज, उमेश कळोसे, ए. के. सोनी, एस. एस. साव, के. एम. मालपाणी, के. पी. मीना,वि एस पाटील, आर. पी. राम, एस. आर. सिंग, कुमार गौरव आदींसह अन्य कर्मचारी सहभागी झाले होते.