यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । आषाढी एकादशीनिमित्त यावल बस आगारातून वारकऱ्यांसाठी विशेष बससेवा उपलब्ध करून देण्यात आले असून या बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन आगार व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.
यावल येथील बस आगारातुन आषाढी एकादशीच्या निमित्ताने पालखीत सहभागी होण्यासाठी पंढरपुर जाणाऱ्या भाविकांसाठी यावलच्या बसस्थानकातुन प्रतिदिन सकाळच्या वेळेस २ बसेस पंढरीच्या वारीला सोडण्यात येत आहे. यावल एसटी बस आगारातुन प्रतिवर्ष पंढरपुर येथे आषाढी एकादशीच्या पालखीत सहभागी होण्यासाठी पंढरपुरला जाण्याची वारकऱ्यांची भक्तांची परंपरा असुन या निमित्ताने देवदर्शनाला तालुक्यातुन हजारो भाविक जात असतात या अनुषंगाने यावलच्या एसटी बस आगारातुन भाविकांना पंढरपूर येथे विठ्ठलाच्या दर्शनाला जाण्याऱ्या भाविकांसाठी ११ जुलै पासून २० जुलै पर्यंत यावल बसस्थानकावरून सकाळी ७ वाजता व सकाळी ८ वाजता अशी दोन बसेस सध्या पंढरपुर करीता सोडण्यात येणार आहे.
या बसेसला भाविकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान आवश्यकते अनुसार प्रवाशांची मागणी वाढल्यास आपण अतिरिक्त बससेवा भाविकांसाठी तात्काळ उपलब्ध करणार असुन , या सुरक्षीत प्रवाशाच्या संधीचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन यावल एसटी आगाराचे व्यवस्थापक दिलीप महाजन यांनी केले आहे.