पुणे-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात लवकरच महाविकास आघाडीचे सरकार सत्तारूढ होणार असल्याचा दावा राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली चाकणकर यांनी केला आहे.
रूपाली चाकणकर या बारामतीत गोविंद बाग या ठिकाणी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी आल्या होत्या त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.त्या म्हणाल्या की, ’शंभुराज देसाई म्हणतात पुढचे २५ वर्ष राष्ट्रवादीची सत्ता येणार नाही. पण त्यांनी २५ वर्षाच्या सत्तेची भाषा करू नये, मुळात आत्ताच जे सरकार सत्तेत आलंय ते शिंदे-फडणवीस हे सरकार छळकपट हिटलरशाही आणि दबाव यंत्रणांचा वापर करुन आलं आहे. त्याचबरोबर महिना दोन महिन्यांमध्ये काय परिस्थिती होतेय ते बघा. हे सरकार परत उलटणार आणि महाविकास आघाडी परत सत्तेत येणार असंही त्या म्हणाल्यात.
त्या पुढे म्हणाल्या की, आमदार सांभाळणं महाराष्ट्राचा कारभार सांभाळणं तेवढं सोप्प नाही ते फक्त अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांनीच चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कोरोनाच्या काळामध्ये सिद्ध करून दाखवलं होतं. राज्य सांभाळनं एकनाथ शिंदे यांना जमणार नाही.