ई-फायलींगमुळे एका दिवसात मिळणार प्राप्तीकराचा परतावा

नवी दिल्ली वृत्तसंस्था । केंद्र सरकारने आता ई-फायलींग प्रणालीला कार्यान्वित करून एका दिवसात प्राप्तीकर परतावा देण्याचा निर्णय घेतला आहे.

नवी प्रक्रिया लागू करण्याचा निर्णय बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी याबाबत माहिती दिली. नव्या प्रक्रियेमुळे प्राप्तिकराचे संकलन वेगाने करणे शक्य होईल. विवरणपत्रातील चुकांची दुरुस्ती करण्याची प्रक्रिया आणखी सुलभ आणि झटपट होणार असल्याचे गोयल म्हणाले.

सध्या प्राप्तिकर विवरणपत्रांची छाननी करण्यासाठी सध्या ६३ दिवसांचा कालावधी लागतो. पण हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर जर तुम्ही विवरणपत्र अचूक दाखल केले असेल तर एका दिवसात परतावा मिळेल. ही नवी सुविधा निर्माण करण्यासाठी दीड वर्ष लागू शकते. यानंतर याला कार्यान्वित केले जाणार आहे.

Add Comment

Protected Content