धरणगाव प्रतिनिधी । धरणगावात लवकरच अद्ययावत उपजिल्हा रूग्णालयात उभारण्यात येणार असून येथे ५० ते १०० ऑक्सीजन बेडची सुविधा असेल अशी महत्वपूर्ण घोषणा आज पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी केली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून धरणगाव येथे आयोजित अत्याधुनीक कार्डियाक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करतांना ते बोलत होते.
याबाबत वृत्त असे की, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त आज धरणगावात कार्डियाक रूग्णवाहिकेचा लोकार्पण सोहळा आयोजित करण्यात आला. याच कार्यक्रमात धरणगाव ग्रामीण रूग्णालयाच्या बळकटी करणासाठी सढळ हाताने मदत करणार्या दात्यांचा गौरव देखील करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिवसेना जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. ते म्हणाले की, पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या अविरत प्रयत्नांमुळे धरणगावात चांगल्या प्रकारची वैद्यकीय सुविधा उपलब्ध आहे. येथे अगदी ४ वर्षाच्या बालकापासून ते ८४ वर्षाच्या वृध्दापर्यंतच्या रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी एका रूग्णाला जळगावच्या जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी पाठविण्याची वेळ आली तेव्हा खासगी आणि सरकारी रूग्णवाहिका लवकर मिळाली नाही. यामुळे येथे अद्ययावत रूग्णवाहिका नागरिकांसाठी ना.गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या आमदार निधीतून उपलब्ध करून दिली आहे. तर काही दिवसांपूर्वीच स्वर्गरथाचे लोकार्पणही करण्यात आले असल्याने धरणगावकरांच्या दोन महत्वाच्या गरजा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी पूर्ण केल्याचे कौतुकोदगार त्यांनी काढले.
याप्रसंगी आपल्या मनोगतातून पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, धरणगावात स्वर्गरथ आणि रूग्णवाहिका यांची सुविधा आता उपलब्ध करण्यात आली आहे. शहरात आधी शिवसेनेची एक आणि १०८ क्रमांकाची शासकीय एक अशा दोन अँबुलन्स असतांना आता अत्याधुनिक कार्डियाक रूग्णवाहिका उपलब्ध करण्यात आली आहे. याच्या मदतीने गंभीर रूग्णांचे प्राण वाचवण्यासाठी मदत होणार आहे. धरणगावात अत्याधुनीक असे उपजिल्हा रूग्णालय उभारण्यात येणार असून येथे ५० – १०० बेडची व्यवस्था असेल. जेणेकरून धरणगावातील रूग्णांना इतरत्र जाण्याची गरज उरणार नाही. त्याबाबत उपस्थिती असलेले सिव्हील सर्जन एन. एस. चव्हाण यांना तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात बाबत निर्देश दिले. तसेच येथील ग्रामीण रूग्णालयासाठी एनआरएचएमच्या माध्यमातून एक कोटी निधीतून नवीन इमारत बांधली जाणार आहे. ग्रामीण रुग्णालयात साहित्य सामग्रीसाठी देखील ७० लाखांना निधी प्रदान करण्यात आला असून 2-3 दिवसात साहित्य उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. तर शहराजवळ एम.आय.डी.सी. उभारण्याचा मानस असून शहराच्या आगामी ३० वर्षांची लोकसंख्या लक्षात घेऊन पाणी पुरवठा योजनेचे नियोजन सुरू आहे. मतदारसंघातील कान्या-कोपर्यात उत्तम दर्जाचे रस्ते तयार असल्याचे ना. पाटील म्हणाले. धरणगाव शहर हे मोठी मार्केट म्हणून उदयास यावे यासाठी आपले प्रयत्न असल्याची ग्वाही ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी दिली. यानंतर पालकमंत्री गुलाबराव पाटील , जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत विधिवत पूजा करून कार्डियाक या आधुनिक रूग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले.
यांची होती उपस्थिती
यावेळी कार्यक्रम प्रसंगी शिवसेना जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ, लोकनियुक्त नगराध्यक्ष निलेश चौधरी, माजी नगराध्यक्ष सुरेश नाना चौधरी, उपनगराध्यक्ष कल्पना विलास महाजन, प्रांताधिकारी विनय गोसावी, नायब तहसीलदार प्रथमेश मोहोळ, जिल्हा शल्यचिकित्सक एन.एस. चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख संजय पाटील, शहर प्रमुख राजेंद्र महाजन, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील , गटनेते पप्पू भावे , मुख्याधिकारी जनार्दन पवार, पोलीस निरीक्षक पवन देसले, मंडळ अधिकारी वनराज पाटिल, माजी नगराध्यक्ष उषाताई वाघ, नगरसेविका अंजलीताई विसावे, सुरेखा महाजन, कीर्ती मराठे, शहर तलाठी सुरवाडे, उद्योपती किशोर डेडीया, सुनील मालू, राजेंद्र पाटील, राजेंद्र ठाकरे, नगरसेवक वासुदेव चौधरी, विलास महाजन.,सुरेश महाजन, अहमद पठाण, विजय महाजन, बापू पारेराव, अजय चव्हाण, भागवत चौधरी, भानुदास विसावे, माळी समाज उपाध्यक्ष योगराज महाजन, निंभाजी महाजन, राहुल रोकडे, अक्षय मूथा, लक्ष्मण महाजन, दिपक पाटील, चेतन जाधव, रवी जाधव , बुट्या पाटील अफजल शेख संजय चौधरी, नंदू पाटील,सतिश बोरसे, नाना चौधरी, कमलेश बोरसे, किरण अग्निहोत्री, अरविद चौधरी, गोलू चौधरी, परमेश्वर महाजन, पापा वाघरे, संजय पचेरवार, भैया महाजन, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाप्रमुख गुलाबराव वाघ यांनी केले. सूत्रसंचालन माजी नगरसेवक अभिजित पाटील यांनी तर आभार पी.एम.पाटील सर व विनोद रोकडे यांनी मानले.
https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2419615511667122