लवकरच शेतकर्‍यांना मिळणार दिलासा-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई प्रतिनिधी । आजवर शेतकर्‍यांना करण्यात आलेली मदत आणि विविध योजनांचे वास्तववादी चित्रण जाणून घेत लवकरच शेतकर्‍यांसाठी मोठी मदत करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिली. ते मंत्रीमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत बोलत होते.

आजच शपथविधी घेतलेल्या उध्दव ठाकरे यांच्या मंत्रीमंडळाची पहिली बैठक आज घेण्यात आली. यात बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील, छगन भुजबळ, एकनाथ शिंदे आणि सुभाष देसाई यांच्यासह महाआघाडीच्या महत्वाच्या नेत्यांचा समावेश होता. याच अजित पवार, धनंजय मुंडे आदींचा समावेश होता. या बैठकीनंतर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन यातील निर्णयांची माहिती दिली. ते म्हणाले की, मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच येत आहे. आपले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असल्याची ग्वाही त्यांनी दिली. रायगडाच्या नूतनीकरणासाठी २० कोटींच्या निधीला मंत्रीमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान, अतिवृष्टीने राज्यातील शेतकर्‍यांचे मोठे नुकसान झाले असल्याने आजवरच्या मदती आणि योजनांचे वास्तव चित्रीकरण करण्याचे निर्देश आम्ही अधिकार्‍यांना केले आहे. दोन दिवसात ही माहिती हातात आल्यानंतर यानंतर शेतकर्‍यांना मदत करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.

Protected Content