नवी दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | सोनिया गांधी यावेळी लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत. पीटीआय या वृत्तसंस्थेनुसार, पक्षाच्या सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करणार आहेत. यावेळी त्यांच्यासोबत पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधीही उपस्थित राहणार आहेत.
राहुल गांधी मंगळवारी संध्याकाळीच छत्तीसगडहून दिल्लीला पोहोचले. मनमोहन सिंग यांच्या जागेवरून सोनिया गांधी यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे. माजी पंतप्रधानांचा कार्यकाळ 3 एप्रिल 2024 रोजी संपत आहे. सोनिया गांधी राज्यसभेवर जाण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्या 5 वेळा लोकसभेच्या खासदार आहेत. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी देखील राज्यसभेच्या खासदार होत्या