धरणगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | शहरातील हनुमाननगरात राहणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीने दारूच्या नशेत राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी १७ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आले आहे. याप्रकरणी दुपारी १२ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुरेश सुकलाल मराठे वय ५०, रा . हनुमान नगर धरणगाव अशी मयत व्यक्तीचे नाव आहे.
या संदर्भात अधिक माहिती अशी की, सुरेश मराठे हे आपल्या परिवारासह हनुमान नगरात वास्तवाला आहेम दरम्यान मध्यरात्री त्यांनी राहत्या घरात साडी ने गडपास घेऊन आत्महत्या केली आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. ही घटना सोमवारी १७ मे रोजी सकाळी ७ वाजता समोर आहे. याप्रकरणी धरणगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महेंद्र पाटील हे करीत आहे.