सोमय्याचा मोठ्ठा घोटाळा जाहीर होणार : लडाख दौऱ्यात खा. राऊत यांचा आरोप

नवी दिल्ली, लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | आतापर्यंत सोमय्या यांनी शेकडो आरोप केलेत, पण एकही सिद्ध झालेला नाही. परंतु राज्यात परत येईल तेव्हा लवकरच सोमय्यांचा आणखी एक मोठ्ठा घोटाळा बाहेर काढणार आहे.असे लडाख दौऱ्यावर असलेले खा. संजय राऊत यांनी केला आहे.

१०० कोटी रुपयाच्या कथित शौचालयाचे घोटाळ्यात मेघा सोमय्या आणि युवा प्रतिष्ठानला अडकवले आहे. यावरून खा. संजय राऊत यांच्याविरुद्ध १०० कोटी रुपयांचा अब्रुनुकसानीचा दावा भाजपचे खा. किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेघा सोमय्या यांनी  न्यायालयात दाखल केला आहे.

यावरून किरीट सोमय्या यांनी कोटीच्या कोटीचे आरोप केले आहेत. ते सर्व खोटे असून या खोट्या आरोपांची उत्तरे द्यायला काय सोमय्या साधुसंत आहे का? काहीही बडबड करीत अबुनुकसानीचा दावा केला म्हणजे अतीच आहे. पण हाती काहीच येणार नाही. थोडे थांबा,  या लडाख दौऱ्यानंतर राज्यात गेलो कि सोमय्याचा आणखी एक मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचा इशारा लडाख मधूनच दिला आहे.

Protected Content