जळगाव (प्रतिनिधी) सामाजिक शास्त्र या विषयात १०० पैकी १०० गुण मिळू शकतात आणि विद्यार्थ्यांची एकूण टक्केवारी वाढून मेरिट पर्सनटेज वाढीसाठी याचा खूप फायदा होऊ शकतो असे मत ईम्यानुअल कोचिंग क्लासचे संचालक समीर शेफर्ड यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सी.बी.एस.सी. पॅटर्न व स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांसाठी स्पेशल सोशल सायन्स या विषयाचे कोचिंग करणारा ईम्यानुअल कोचिंग क्लास हा खान्देशातील एकमेव क्लास आहे. यंदाच्या वर्षी १० (सी,बी.एस,सी,) परीक्षेत क्लासच्या ८ विद्यार्थ्यांना सोशल सायन्स विषयांत १०० पैकी १०० तर ८० विद्यार्थ्यांना ९५ टक्केपेक्षा जास्त मार्क मिळाले आहेत. मागील ७-८ वर्षांपासूनची १०० टक्के निकालाची परंपरा यावर्षीही कायम आहे. समीर शेफर्ड यांचे शिक्षण हे एम.ए.बी.एड. असून सामाजिक शास्त्र विषयाचे कोचिंगचा त्यांना पंधरा वर्षाचा प्रदीर्घ अनुभव आहे. ते भुसावळ येथील सेंट पॉल प्री प्रायमरी स्कूलचे संचालक देखील आहेत. सेंट जोसेफ स्कूल, स्वामी समर्थ केंद्रासमोर, गुरुकुल कॉलनी येथे रेग्युलर, व्होकेशनल आणि संडे बॅच सुविधा असून नियमित टेस्ट घेलातल्या जात असतात.
पहा इमॅन्युअल कोचींग क्लासबद्दल काय म्हणाले विद्यार्थी