धरणगाव येथे शाहू महाराज जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन साजरा

3dbbace2 3d33 4dff baad 1888f90ff5fa

धरणगाव (प्रतिनिधी) येथील गुड शेपर्ड इंग्लिश मिडियम स्कुलमध्ये राजर्षी शाहू महाराजांची जयंती व सामाजिक न्याय दिन या दोन्ही दिवसांचे औचित्य साधून घेतलेला कार्यक्रम उत्साहात पार पडला.

 

सर्वप्रथम शाळेच्या प्राचार्या चैताली रावतोळे व शाखा व्यवस्थापक जगन गावित यांनी शाहू महाराजांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. कोल्हापूरच्या संस्थानात नोकरीत ५०% आरक्षण देण्याचे काम महाराजांनी केले. विज्ञानवादी दृष्टीकोन असलेले राजे शाहू महाराज हे केवळ आरक्षणाचे जनक नसून जातीभेद निर्मूलन करणारे द्रष्टे समाज सुधारक होते, असे प्रतिपादन शिक्षक लक्ष्मण पाटील यांनी केले. कार्यक्रमाला सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी सर्व शिक्षकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content