अमळनेर (प्रतिनिधी)। अमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुलामुलींनी स्नेहसमेलातून सामाजिक प्रबोधन करण्याचे संदेश दिले. पहिली ते चौथी पर्यंतच्या मुलांनी शेतकरी आत्महत्या, देशभक्ती, वृक्षलागवड व संगोपन, स्त्री भृण हत्या, दारूबंदी, बेटी बचाव बेटी पढाव, सर्व धर्म समभाव आदी विषयांवर नृत्य व नाट्य सादर करून सामाजिक प्रबोधन केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रमुख अतिथी सरपंच हर्षदा पाटील, उपसरपंच संजय रामदास पाटील, ग.स.बँकेचे माजी चेअरमन झांबर राजाराम पाटील, शिक्षक संघटनेचे संजय कृष्णा पाटील, माजी उपसरपंच इंदूबाई पाटील, माजी पोलीस पाटील बापू पाटील आदींनी द्विपप्रज्वलन करून उदघाटन केले. कार्यक्रमाचे आयोजन शाळा समितिचे अध्यक्ष दीपक पाटील, उपाध्यक्ष राजेश पाटील, मुख्याध्यापिका आशा भदाणे, ज्ञानेश्वर गोसावी, सदाशिव पवार, उषा भदाणे, नीलम चौधरी, लालचंद गोपाळ, शीतल पाटील यांनी केले होते. प्रास्ताविक व सूत्रसंचालन शशिकांत गोसावी तर आभार आशा भदाणे यांनी मानले.