स्व.हरिभाऊ जावळे यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम सोहळा उत्साहात

फैजपूर प्रतिनिधी । भारतीय राष्ट्रीय युवा परिषद यावल व रावेर तालुक्याच्या वतीने स्व. हरिभाऊ जावळे यांच्या ६८व्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रमाचा सोहळा फैजपूर येथील सुमंगल लॉन येथे प्रशासनाचे सर्व नियमात संपन्न झाला. 

या सोहळ्यात दहावी व बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा घेण्यात आला. कोरोना योध्दा म्हणून डॉक्टर्स, महसूल, पोलिस प्रशासन, पत्रकार, आशा स्वयसेविका, शिक्षक, रुग्णवाहिका ड्रायव्हर, लब्रोटरी चालक, मेडिकल चालक अशा सर्व क्षेत्रातील योध्दांचे प्रतिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. आदिवासी पाड्यातील 5 विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. राष्ट्र कार्यासाठी गेलेले कारसेवकांचां सन्मान करण्यात आला. कला क्षेत्रातील जे आर्टिस्ट आहेत. त्यांचा सुद्धा या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. 

फैजपूर प्रांत अधिकारी डॉ.अजित थोरबोले व तहसीलदार जितेंद्र कूवर यांची बदली झाल्याने त्यांनी जी सेवा दिली त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात स्व. हरिभाऊ जावळे व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलन करुन झाली. प्रदेश उपाध्यक्ष तेजस पाटील यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, ज्यांच्या विचारत तेज, बोलण्यात नम्रता, वागण्यात सौजन्य व हृदयात स्नेहांचा झरा असणारे स्व. हरिभाऊ जावळे हे समाजकारणला अधिक महत्त्व देत असतं. त्यामुळें त्यांच्या जयंती औचित्य साधून हा उपक्रम सोहळा घेण्यात येत आहे. 

आठवणींना दिला उजाळा 

प्रमुख पाहुणे म्हणून बोलतांना राजू मामा यांनी स्व. हरिभाऊ जावळे यांच्या आठवणींना उजाळा दिला. हरिभाऊ हे जनसामान्यांचे नेतृत्व होते, भाऊंनी नेहमीच शेतकऱ्यांचे प्रश्न साठी लढले आहेत. सिंचन साठी, पावसाचे पाणी जिरविण्यासाठी थेंब अमृताच्या माध्यमातून लोकसहभागातून काम केले आहे. राष्ट्र कार्याविषयी माहिती दिली. कार्यक्रमाच्या आयोजकांचे कौतुक यावेळी राजू मामा यांनी केले. अशाचप्रकारे सर्व सामाजिक उपक्रम एकत्र करून सामाजिक उपक्रमाचा सोहळा घेतला. असेच पुढेही काम करत राहावे यासाठी शुभेच्छा दिल्या. जिल्हा अध्यक्ष प्रतीक्षा पाटील व जिल्हा मुख्य सचिव दिव्या पाटील यांनी सुध्दा शुभेच्छा दिल्या.

यांची होती उपस्थिती 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ स्वयं सेवक अनंत कुलकर्णी होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा ग्रामीण जिल्हा अध्यक्ष व जळगांव शहराचे आमदार राजू मामा भोळे, प्रांत.अधिकारी डॉ.अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुवर, पोलिस निरीक्षक अरुण धनवडे, पोलिस निरीक्षक प्रकाश वानखेडे, बेटी बचाव बेटी पढावचे राष्ट्रीय संयोजक डॉ. राजेंद्र फडके, अशोक कांडेलकर, शरद महाजन, युवा उद्योजक अमित सोळुंके, प्रदेश अध्यक्ष राहुल वाकलकर, जिल्हा उपाध्यक्ष अनिल बाविस्कर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य कुणाल कोल्हे, प्राजक्ता राणे, योगेश चौधरी अमळनेर मुख्य सचिव योगेश कोळी असे यावेळी उपस्थिती होते.

यांनी केले परिश्रम 

कार्यक्रम यशस्वीतेसाठी तालुका अध्यक्ष दर्पण खेवलकर व राज खाटीक यांच्यासोबत टीम मधील साक्षी पाटील,आशिष बोरोले दुर्गेश पाटील, विनोद कोल्हे प्रतीक वारके, चेतन पाटील, राजश्री पाटील, अक्षय महाजन, मयुर सोनवणे, संकेत भंगाळे, पियूष बऱ्हाटे, अभिजित मोरे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता राणे व आशिष बोरोले व आभार दर्पण खेवलकर यांनी मानले.

 

Protected Content