जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यात आतापर्यंत 27 लाख 54 हजार 572 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 20 लाख 62 हजार 973 जणांना पहिला डोस तर 6 लाख 91 हजार 599 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी शुक्रवारी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 20 लाख 62 हजार 973 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 6 लाख 91 हजार 599 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 27 लाख 54 हजार 572 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 11 लाख 30 हजार 605 तर ग्रामीण भागातील 16 लाख 23 हजार 967 नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार आज शुक्रवार 29 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.