जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख 09 हजार 719 जणांना कोरोना लसीकरण

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत 24 लाख 09 हजार 719 जणांना कोरोना लस देण्यात आली आहे. यात 18 लाख 15 हजार 728 जणांना पहिला डोस तर 5 लाख 93 हजार 991 जणांना दुसरा डोस देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवारी 5 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता पाठविलेल्या प्रसिध्दपत्रकाद्वारे कळविले आहे.

जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व कोरोनापासून बचावासाठी जळगाव जिल्ह्यातील महत्वाच्या ठिकाणी कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रामार्फत जिल्ह्यात आतापर्यंत 18 लाख 15 हजार 728 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस तर 5 लाख 93 हजार 991 लाभार्थ्यांना दुसरा डोस असे एकूण 24 लाख 09 हजार 719 लाभार्थ्यांना लसीचे डोस देण्यात आले आहे. यात शहरी भागातील 10 लाख 10 हजार 944 तर ग्रामीण भागातील 13 लाख 98 हजार 775  नागरीकांचा समावेश आहे. जिल्ह्यातील प्रत्येक नागरीकांनी कोरोना लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भिमाशंकर जमादार यांनी आज मंगळवार 5 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता दिलेल्या प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Protected Content