अमळनेर प्रतिनिधी । तिकिट कापल्यामुळे नाराज असल्याची चर्चा असणार्या आमदार स्मिता वाघ या उन्मेष पाटील यांच्या प्रचारात सक्रीय झाल्या असून त्यांनी आजच्या मेळाव्यात भाग घेतला.
भारतीय जनता पक्षातर्फे पदाधिकारी बन्सीलाल पॅलेस येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार स्मिता वाघ यांनी मार्गदर्शन कारित भारतीय जनता पक्षाचे जलगांव लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार उन्मेषदादा पाटिल यांना तालुक्यातुन सर्वाधिक मताधिक्य देण्याचे आवाहन उपस्थितांना केले. गेल्या अनेक वर्षापासून जलगांव जिल्हा भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला असून एम. के. अण्णा पाटिल यांच्या पासून ए. टी. नाना पाटिल यांनी या मतदार संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. प्रत्येक वेळेला अमलनेर तालुक्यातुन मताधिक्य मिळाले असून ह्या वेळेला देखील आ उन्मेषदादा पाटिल यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी कार्यकर्त्यांनी सज्ज राहवे असे मत आमदार स्मिताताई वाघ यानी ह्या प्रसंगी व्यक्त केले.
या बैठकीला भाजपचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब पाटील, शहराध्यक्ष शितल देशमुख, ता.सरचिटणीस जिजाब पाटील, हिरालाल पाटील, दिलीप ठाकुर, उमेश वाल्हे, पंचायत समिति सभापती वजाताई भील, श्याम अहिरे, पं. स.सदस्य भिकेश पाटील, व्हि.आर.पाटिल, प्रफुल्ल पवार, नाटेश्वर पाटिल, राकेश पाटिल, दिनेश नाईक, अनिल जैन, कदामत मेवाती, प्रकाश पाटिल, माधुरी पाटिल, पुष्पाबाई पाटिल, कविता जाधव, गुलाब पाटिल, जितेंद्र पाटिल,कामराज पाटिल,अजय केले, शरद सोनवणे, कामराज पाटील,एम.डी. चौधरी, एन.डी. पाटील,जुलाल पाटील,प्रफुल्ल पवार, नगरसेवक नरेंद्र संदानशिव, निशांत अग्रवाल, रामकृष्ण पाटील,विवेक पाटील,नुतन पाटील,प्रविण पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष योगिराज चव्हाण,समाधान पाटिल,सौरभ लोटन पाटील, सौ.पुष्पाबाई राजपूत, माधुरी पाटील,निरंजनी देशमुख,स्वाती पाटील,शिला विंचुरकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान, आमदार स्मिताताई वाघ या प्रचारात सक्रीय झाल्यामुळे महायुतीच्या गोटात उत्साहाचे वारे संचारल्याचे दिसून येत आहे.