जळगाव (प्रतिनिधी): कुलर चालू असतांना त्याला हात लावल्याने विजेच्या धक्क्याने सहा वर्षीय बालकाचा मृत्यू ओढावल्याची घटना आज सकाळी ६.३० वाजेच्या सुमारास खंडेराव नगर येथे घडली. याबाबत रामानंदनगर पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता पहिलीत शिकत असलेल्या आरो सुनील भोईर (वय ६ ,रा. खंडेराव नगर) सकाळी घरात खेळत असतांना त्याचा पत्र्याच्या कुलरला स्पर्श झाल्याने विजेच्या धक्क्याने तो दूर फेकला गेला. त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रविण पाटील यांनी मृत घोषित केले. घटनेबाबत परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेबाबत रामानंदनगर पोलिस अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. बालकाच्या पश्चात आई, वडील, मोठा भाऊ, आजी-आजोबा असा परिवार आहे.