भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भडगाव तालुक्यातील पिचर्डे येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी भडगाव पोलीस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणात न्यायालयाने सर्वांना शिक्षा सुनावली आहे.
भडगाव तालुक्यातील पिचर्डे गावातील ज्ञानेश्वर रमेश जाधव (वय-२६) या तरूणाने दिलेल्या फिर्यादीवरून भडगाव पोलीस ठाण्यात मारहाण केल्याप्रकरणी दिनकर केशव संसारे, वना सागा मोरे, योगेश फुला मोरे, राजु दीनकर संसारे, बेबाबाई वना मोरे आणि कोकिळाबाई दिनकर संसारे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यता आला होता. आरोपींविरोधात तत्कालीन नेमणुकीचे सहाय्यक फौजदार शालिग्राम बाजीराव पाटील यांनी दोषारोप पत्र सादर केले होते. या गुन्ह्यातील आरोपींना न्यायालयाने दोषी ठरवत प्रत्येकी तीन महिने साधा कारावासाची शिक्षा व प्रत्येकी रक्कम पाचशे रुपये प्रमाणे द्रव्य दंडाचे शिक्षा सुनावण्यात आली आहे आरोपी यांनी दंड न भरल्यास दहा दिवसाचा साधा कारवासाची शिक्षा सुनावली आहे.
तसेच याच प्रकरणात भादंवि कलम १४८, १४९, ३२३ तसेच १४९ अंतर्गत दोन वर्षे कारावास आणि साक्षीदाराला एकत्रीतपणे सहा हजार रूपयांची भरपाई देण्यात यावी असे देखील न्यायाधिशांनी सुनावले आहे.सर्व आरोपींनी कलम 357 प्रमाणे एकत्रितपणे सहा हजार रुपये नुकसान भरपाई निकालाचे तारखेपासून ३० दिवसाच्या आत देण्यात यावे, असा निकाल प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी श्रीमती एस एस चव्हाण मॅडम यांनी दिलेला असून शिक्षा सुनावली आहे. सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी वकील मनोज माने यांनी काम पाहिले असून पोलीस निरीक्षक पाटील यांचे मार्गदर्शनाखाली पैरवी अधिकारी सफौ रमण कडारे, केसवाच पोकॉ भाऊराव पाटील यांनी साक्षीदार यांना मार्गदर्शन केले आहे