जळगाव (प्रतिनिधी)। मुंबई येथे झालेल्या अश्वमेध क्रीडा महोत्सवात कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला दोन रौप्य व चार कास्यपदक प्राप्त झाले. मुंबई विद्यापीठात नुकत्याच अश्वमेध क्रीडा स्पर्धा झाल्या. कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला एकूण सहा पदके प्राप्त झाली. 4 बाय 400 रिले धावण्याच्या स्पर्धेत भागवत महाजन, असिफ तडवी (नाईक महाविद्यालय, रावेर), रविसिंग पाडवी (जिजामाता महाविद्यालय, नंदूरबार) व गणदास बारेला (मु.जे.महाविद्यालय, जळगाव) या खेळाडूंच्या संघाने कास्यपदक प्राप्त केले. तसेच 4 बाय 100 रिले स्पर्धेही याच खेळाडूंसोबत विशाल निकम (पीएसजीव्हीपी महाविद्यालय, शहादा) यांच्या संघाने कास्यपदक प्राप्त केले.
विशाल धनगर (कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, चोपडा) या खेळाडूने 500 मिटर धावण्याच्या स्पर्धेत कास्य व 1500 मिटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य पदक प्राप्त केले. रवि पाडवी (जिजामाता महाविद्यालय, नंदूरबार) या खेळाडूने 400 मिटर धावण्याच्या स्पर्धेत रौप्य तर 200 मिटर धावण्याच्या स्पर्धेत भागवत महाजन या खेळाडूने कास्यपदक प्राप्त केले. स्पर्धेतील या यशाबद्दल कुलगुरु प्रा.पी.पी.पाटील यांनी खेळाडूंचा गौरव केला. यावेळी व्य.प.सदस्य दिलीप पाटील, दीपक पाटील तसेच प्रा.शौलेश पाटील, क्रीडा संचालक डॉ.दिनेश पाटील उपस्थित होते.