जळगाव, प्रतिनिधी | दुसर्या राज्यस्तरीय लेवा गणबोली साहित्य संमेलनाची रूपरेषा निश्चित करण्यासाठी उद्या (दि.१७) कवयित्री बहिणाबाई उद्यान, रिंगरोड, एम.जे.कॉलेजरोड, जळगाव येथे सकाळी १०.०० वाजता एका बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे .
या भाषेत साहित्य लिहिणारे साहित्यिक, कवी व साहित्यप्रेमींनी या बैठकीला उपस्थित रहावे. बैठकीत विविध विषयांवर महत्वाची चर्चा होणार आहे. विविध समित्यांची स्थापना करण्याबाबतही चर्चा केली जाणार आहे. या महत्वपूर्ण बैठकीस मुंबई येथील जेष्ठ संशोधक, इतिहासकार आणि भाषेचे गाढे अभ्यासक डॉ.नि.रा. पाटील खास उपस्थिती राहणार आहे. त्यांची गेल्या आठवड्यातच संमेलनाध्यक्ष म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
साहित्यिक आणि प्रेमींनी यावेळी आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन लेवा गणबोली साहित्य मंडळाच्यावतीने उपाध्यक्ष व जेष्ठ लेखक डॉ. अरविंद नारखेडे आणि सचिव कवी तुषार वाघुळदे, सहसचिव साहित्यिक व प्रसिद्ध जिल्हा व.वा.वाचनालयाचे संचालक तथा जनता शिक्षण मंडळाचे सचिव प्रभात चौधरी, शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य, जेष्ठ लेखक डॉ.प्र.श्रा. चौधरी तसेच प्रा.संध्या महाजन, संजय पाटील, नेहा वाघुळदे, चित्रकार लिलाधर कोल्हे, वीणा नारखेडे, रश्मी पाटील, ज्योती राणे आदींनी केले आहे.