Home Uncategorized गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात श्रींची स्थापना !

गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयात श्रींची स्थापना !

0
181

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव येथील गोदावरी अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. विजयकुमार पाटील यांच्या उपस्थितीत प्रा. वेलचंद होले यांच्या हस्ते सपत्नीक गणरायाची स्थापना करण्यात आली.

महाविद्यालयामध्ये श्री गणेश उत्सव विद्यार्थी समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये नितेश पाटील, तेजस पाटील, शुभम खर्चे, पल्लवी पखाले, जान्हवी बोरसे, दिव्यांशु येशी, प्रथम शेटे, गणेश कोलते, यश नारखेडे, नेहा पवार, सौरभ वानखेडे, अनंत नारखेडे, सारंग पाटील व प्रज्ञा जंजाळ या विद्यार्थ्यांचा समावेश आहे. प्रा. नकुल गाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी समिती कार्य करीत आहे.

गोदावरी कृषी संकुल परिसरात गणरायाचे जल्लोषात आगमन
डॉ. उल्हास पाटील कृषी महाविद्यालयात ढोल ताशांच्या गजरात बाप्पाचे आगमन झाले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. शैलेश तायडे यांच्या हस्ते बाप्पाची स्थापना करण्यात आली. यावेळी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. गणेशोत्सव निमित्ताने वेगवेगळ्या स्पर्धांचे देखील आयोजन केलेले आहे.


Protected Content

Play sound