जळगाव प्रतिनिधी । राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे उद्योजक श्रीराम पाटील यांना रावेर मतदारसंघातून उमेदवारी काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.
रावेर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपने पहिल्याच यादीत विद्यमान खासदार रक्षाताई खडसे यांची उमेदवारी जाहीर केली असून त्यांनी झपाट्याने प्रचारदेखील सुरू केला आहे. मात्र राष्ट्रवादी व काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराबाबत आजवर संभ्रमाचे वातावरण होते. पहिल्यांदा हा मतदारसंघ राष्ट्रवादी लढविणार की काँग्रेस ? यावरून तर्क-वितर्क सुरू होते. काही दिवसांपूर्वीच हा मतदारसंघ राष्ट्रवादीच्या वाट्यालाच असल्याचे अधोरेखीत झाल्यानंतर उमेदवारांबाबत चर्चा सुरू झाली. यात माजी विधानसभाध्यक्ष अरूणभाई गुजराथी, अॅड. रवींद्रभैय्या पाटील, माजी आमदार संतोष चौधरी, जिल्हा परिषद सदस्य रवींद्र नाना पाटील, माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, उद्योजक श्रीराम पाटील आदी नावांबाबत चर्चा करण्यात आली. मात्र निवडणुकीची धामधुम सुरू झाल्यावरही उमेदवार जाहीर न झाल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये नाराजी होती. या पार्श्वभूमिवर, आज सकाळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना रावेर लोकसभा मतदारसंघासाठी उद्योजक श्रीराम पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळण्याची शक्यता असून याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते. याबाबत लवकरच घोषणा होऊ शकते.