पालघर नगरपालिकेवर युतीची सत्ता तर नगराध्यक्षपद मात्र राष्ट्रवादीकडे

 

0Shivsena Bjp 45

 

 

 

मुंबई (वृत्तसंस्था) लोकसभेच्या रणधुमाळीतही सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या पालघर नगर परिषदेतील २८ पैकी तबब्ल २१ जागा जिंकत शिवसेना-भाजपा युतीने निर्विवाद सत्ता मिळवली आहे. तेथील मजमोजणी अद्याप सुरू असून निकलांची अधिकृत घोषणा व्हायची आहे. त्याचवेळी नगराध्यक्षपदाच्या लढतीत शिवसेनेच्या श्वेता पिंपळे यांचा एक हजारांहून अधिक मतांनी पराभव करत आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या डॉ.उज्ज्वला काळे यांनी विजय मिळवला आहे. त्यामुळे सत्ता युतीची आणि नगराध्यक्ष आघाडीचा अशी राजकीय स्थिती तेथे असेल.

 

दोन नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने २६ जागांसाठी ९० उमेदवार रिंगणात होते. तथे सकाळपासून मतमोजणी सुरू झाली. त्यात शिवसेनेने १४, भाजपाने सात असा २१ जागंवर विजय मिळवला तर आघाडीला दोन जागांवर समाधान मानावे लागले. पाच जागांवर अपक्ष निवडून आले असून त्यातील बहुतांश युतीतील बंडखोर आहेत. नगरपालिकेसाठीच्या जागा वाटपात भाजपाला झुकते माप देत सांभाळून घेण्याचा प्रयत्न शिवसेनेने यावेळी केला होता. पालघरच्या लोकसभा मतदारसंघाची गरज लक्षात घेऊन यंदा सेना-भाजपाची प्रथमच युती झाली. २८ जागांपैकी १७ जागी शिवसेना, तर नऊ जागी भाजपा लढत होती. महायुतीत सहभागी असूनही आठवलेंच्या रिपब्लिकन पक्षाला एकही जागा सोडण्यात आलेली नव्हती. युतीत नगराध्यक्षपद शिवसेनेला सोडण्यात आले होते. काँग्रेस, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, जनता दल यांची आघाडी झाली होती. राष्ट्रवादी १५, काँग्रेस सात, बविआ पाच, तर जनता दल एका जागेवर लढत होते.

पालघर न.पा. पक्षीय बलाबल
एकूण जागा – २८
शिवसेना – १४
भजपा – ०७
राष्ट्रवादी – ०२
अपक्ष – ०५

Add Comment

Protected Content