Home Cities अमळनेर श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात विशेष आरास

श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त मंगळग्रह मंदिरात विशेष आरास

0
46

 

अमळनेर प्रतिनिधी | शहरातील श्री मंगळदेव ग्रह मंदिर येथे आज श्रीकृष्ण जन्मोत्सवानिमित्त विशेष आरास करण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर विशेष धार्मिक कार्यक्रम झाला नाही. मात्र श्री मंगळदेव ग्रहाच्या मूर्तीला श्रीकृष्णाचे रूप देण्यात आले होते. मंदिरातील विश्वातील एकमेव श्री भूमी मातेची व श्री पंचमुखी हनुमानाची मूर्ती व श्री मंगळदेव ग्रहाची पंचधातूची उत्सव मूर्ती यांचीही विशेष सजावट करण्यात आली होती.

मंदिराला विविधरंगी ताज्या फुलांची सुगंधी सजावट मोजक्या भाविकांसाठी का होईना पण लक्षवेधी ठरली.


Protected Content

Play sound