श्री संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी उत्साहात साजरी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तेली समाजाचे आराध्य दैवत ग्रंथकार संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी काल ९ जानेवारी रोजी उत्साहात साजरी करण्यात आली. शहरातून निघालेली शेकडोंच्या संख्येने  मोटरसायकल रॅली व सायंकाळी निघालेली विद्युत रोषणाईतील शिस्तबद्ध भव्य मिरवणुकीने  शहरवासीयांचे लक्ष वेधून घेतले होते. पोलीस बंदोबस्तात या मिरवणुकीचे रात्री दहा वाजता सांगता करण्यात आली.

सकाळी ९ वाजता सुरुवातीला हत्ती गल्लीतील जुन्या तेली भवन येथे श्री संताजी महाराजांची समाजाचे पंच पिंटू चौधरी यांच्या हस्ते सहपत्नीक पूजा करण्यात आली. त्यानंतर त्या ठिकाणाहून शेकडो समाज बांधव तरुण यांच्या उपस्थितीत शहरातील मुख्य रस्त्यांवरून पोलीस बंदोबस्तात संताजी महाराज यांचा जागर करून मोटर सायकल रॅली ही काढण्यात येऊन नव्या तेली भवन येथे सांगता करण्यात आली. सायंकाळी जुन्या तेली भवन येथून विद्युत रोषणाई व डीजे, बँड यश सावद्य वाजंत्रीत श्री संताजी महाराज यांच्या मूर्तीची मोठ्या भक्ती भावाने घोड्याच्या बग्गीतून महिला, तरूण-तरूणी, पुरुष यांच्या उपस्थितीत उत्साहात मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली.

यावेळी पोलीस निरीक्षक सुनील पवार तेली समाजाचे अध्यक्ष कैलास चौधरी यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. आजाद चौक येथे आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते विलोभनीय श्री संताजी महाराज पुतळ्याचे व रथाचे पूजन करण्यात आले. त्या ठिकाणी उपस्थित असलेला हजारो समाज बांधव हा अतिशय लक्षवेधक ठरला भवानी चौक, कसाई मशीद, राम मंदिर चौक न्हावी गल्ली, गणपती चौक ते पुन्हा मूळ ठिकाणावर रात्री दहा वाजता उत्साहपूर्ण वातावरणात सांगता करण्यात आली.

या मिरवणुकीत जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष अमोल पाटील,  माजी नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी नगराध्यक्ष गोविंद शिरोडे, माजी उपनगराध्यक्ष डॉ मंगेश सुधाकर तांबे, माजी नगरसेविका अंजली पवार सह विविध सामाजिक, राजकीय पदाधिकारी प्रतिष्ठित नागरिक व समाज बांधवांनी संताजी महाराज रथाचे पूजन करून उत्साहात सहभागी झाले.यावेळी तेली समाजाचे पंच दिलीप चौधरी साहेबराव चौधरी, विश्वास चौधरी, सतीश चौधरी, मनोज चौधरी, गोकुळ चौधरी नवल चौधरी, अनिल चौधरी, प्रल्हाद चौधरी, धर्मदास चौधरी, अमृत चौधरी, प्रवीण चौधरी, पवन चौधरी, कल्पेश चौधरी, राहुल चौधरी, विकास चौधरीसह सर्व पंचमंडळ, नवयुवक मंडळ व समाज  बांधवांनी यासाठी परिश्रम घेतले.

 

Protected Content