आदिवासी विभागाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेत यावलच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | आदिवासी विकास विभागार्तंगत, घेण्यांत आलेल्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धेत यावल प्रकल्पांतर्गत 18 विद्यार्थ्यांपैकी 11 विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

आदिवासी विकास विभागार्तगत, 4 अपर आयुक्‍त व 30 प्रकल्प कार्यालय यांमध्ये विभाग
स्तरावरुन विजयी झालेल्या खेळाडुच्या राज्यस्तरीय क्रिडा स्पर्धा दिनांक 07 जानेवारी ते दि 09
जानेवारी 2024 या कालावधीत गरुड झेप अकॅडमी, दुगाव, नाशिक येथे पार पडल्या.
आदिवासी विकास विभाग नाशिक अंतर्गत राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धत यावल प्रकल्पातील शासकोय व
अनुदानित आश्रमशाळेमधील 16 मुले व 2 मुली असे एकूण 18 खेळाडूंनी वैयक्तिक क्रोडा प्रकारात
सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 9 मुले व 2 मुली अशा एकुण 1 1विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.

यात 14 वर्षे वयोगटातील सयाराम मन्साराम बारेला (सनफुले) याने लांब उडी प्रकारात द्वितीय
तर 200 मी धावणे स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला, गणेश राजाराम बारेला ( धानोरा) याने उंच उडी प्रकारात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला , भारत मळ्या भिलाला (लालमाती) याने 400 मी धावणे स्पर्धेत राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला, अनिल बद्रि भिलाला ( सनफुले) याने 600 मी धावणे प्रकारात राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला, आरती बाला बारेला ( डोमगाव ) हिने लांब उडी प्रकारात द्वितीय क्रमांक पटकावला.

17 वर्षे वयोगटातील सचिन विक्रम पावरा ( मेहुणबारे) याने 1500 मी धावणे प्रकारात
राज्यस्तरावर तृतीय क्रमांक स्वत) कु. ज्योती भरत भवरे ( मेहुणबारे) हिने उंच उडी प्रकारात
राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावला , प्रवीण पाश्या वसावे ( खडकी) याने गोळा फेक प्रकारात
राज्यस्तरावर तृतीय क्रमांक पटकावला.

19 वर्षे वयोगटातील समाधान दौलत जाधव ( मेहुणबारे ) याने थाळी फेक प्रकारात राज्यस्तरावर
द्वितीय क्रमांक पटकावला, पवन रमेश बारेला ( हातेड ) याने 5000 मी चालणे प्रकारात राज्यस्तरावर
तृतीय क्रमांक पटकावला. याच वयोगटातील मेहुणबारे येथील 4 » 100 मी .रिले संघ राज्यस्तरावर
तृतीय क्रमांकाचे पदक पटकावले. राज्यस्तरावर सहभागी 18 खेळाडूंपैकी 15 खेळाडूंनी राज्यस्तरावर पदक प्राप्त केले.

खेळाडूंना याबल प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अरुण पवार, प्रशांत माहुरे (सहा. प्रकल्प अधिकारी प्रशासन ) पवन पाटील (सहा. प्रकल्प अधिकारी शिक्षण ) राजेंद्र लवणे (सहा. प्रकल्प अधिकारी शिक्षण) श्रीमती मीनाक्षी सुलताने ; एल. एम. पाटील , गायकवाड सर ( कार्यालयीन कर्मचारी मुख्याध्यापक यांनी अभिनंदन व कौतुक केले.

Protected Content