Home आरोग्य ८ ऑगस्टला बुद्धाय श्रमजीवी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी

८ ऑगस्टला बुद्धाय श्रमजीवी फाउंडेशनतर्फे मोफत आरोग्य तपासणी

0
85


पाचोरा प्रतिनिधी । बुद्धाय श्रमजीवी फाऊंडेशन, विरार (पश्चिम) या संस्थेने नागरिकांच्या मदतीसाठी एक पाऊल पुढे टाकत (दि. ८ ऑगस्ट) रोजी ०३ – सुख सागर, खारोडी नाका, बोलिंज रोड, विरार (पश्चिम) येथे सकाळी १० ते दुपारी ३ वाजेपर्यंत मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे. 

कोरोना महामारीमुळे अनेकांचे संसार उद्धवस्त झाले असुन आरोग्या संबंधित व्याधींनी नागरिकांना त्रस्त केले आहे. सर्व सामान्य नागरिकांना कोरोना महामारीमुळे आपला रोजगार गमवावा लागला आहे. शिबिरात मोफत आरोग्य तपासणी, मोफत डोळे तपासणी, मोफत रक्त तपासणी होणार आहे. या शिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष श्रावण घिवरे, डॉ. अरविंद पवार, डॉ. गिरी यांनी केले आहे. तसेच शिबिरात नाव नोंदणी करण्यासाठी श्रावण घिवरे (मो. क्रं. ७०९८१८७७७६), डॉ. अरविंद पवार (मो. क्रं. ७२६२९४८८१५), व डॉ. गिरी (मो. क्रं. ९०२८८६६३९९) या मोबाईल क्रमांकांवर संपर्क करावा.

 

 


Protected Content

Play sound