जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आज बंगलोर येथे आर्ट ऑफ लिव्हिंगचे जनक तथा जागतिक आध्यात्मिक गुरू श्री.श्री.रविशंकरजी यांची भेट घेतली. याप्रसंगी खानदेशात नवी सिंचन क्रांती व्हावी यासाठी चारशे किलोमीटर पदयात्रा करत आरंभलेल्या गिरणा नदी पुनरुज्जीवन अभियानाविषयी श्री.श्री.रविशंकर यांनी केले खासदार उन्मेष पाटील यांचे कौतुक केले.
“गुरूजींच्या” त्रिसूत्रीतून गिरणा अभियान ठरणार “देशासाठी रोल मॉडेल”
याप्रसंगी अभियानात खासदार उन्मेष पाटील यांनी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातुन आदरणीय “गुरूजींच्या” मार्गदर्शनाने अभियान अधीक प्रभावी व्हावे. यासाठी प. पू. श्री श्री रविशंकर यांची भेट घेत आशीर्वाद घेतले. खान्देशातील बहुचर्चित गिरणा पुनरुज्जीवन अभियानातून गिरणा नदी पुन्हा बारमाही वाहण्यासाठी अतिक्रमण, प्रदूषण व शोषणापासून गिरणामाईचे संवर्धन व्हावे. यासाठी केलेली गिरणा परिक्रमा अंतिम टप्प्यात पोहचली आहे. सुमारे शंभर गावांच्या पाणलोट विकासासाठी जलसंधारण, नैसर्गिक शेती, निरोगी व व्यसनमुक्त समाजासाठी “युवक नेतृत्व प्रशिक्षण कार्यक्रम” अशी त्रिसूत्री राबविण्याचा सल्ला दिला. परम पूज्य “गुरूजींच्या” त्रिसूत्रीतून गिरणा अभियान देशासाठी रोल मॉडेल” ठरणार आहे.
यावेळी पारोळा नगरीचे नगराध्यक्ष करन दादा पवार, प्रा. डॉ.पुरुषोत्तम वायाळ, रोहन जैन, अमित देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते. दि,१ जानेवारीपासून सुरु झालेली ३८० किलोमीटरची गिरणा नदी परिक्रमा आता अंतीम टप्प्यात असून गिरणा पुनरुज्जीवन अभियानांतर्गत लवकरच गिरणा वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार आहे.या स्पर्धेच्या माध्यमातून गिरणा काठाच्या १०० गावांमध्ये पाणलोट विकासासाठी जलसंधारण, नैसर्गिक शेती, तरुणांचे व्यसनमुक्ती सह तरुण ऊर्जावान व्हावा. यासाठी आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून गावोगावी “यंग लीडरशिप डेव्हल्पमेंट प्रोग्राम” आयोजित करण्यात येणार आहे.
गिरणा परिक्रमा करणारा युवा जल योद्धा
यावेळी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी गिरणा पुनरूज्जीवन अभियानातून सात बलुन बंधारे बाबत जनजागृती करीत गिरणेचे वैभव पुन्हा प्राप्त करून देण्यासाठी गिरणाकाठावरील ग्रामस्थांशी संवाद साधत असुन सात बलून बंधारेसह गिरणा काठाचा शाश्वत विकासासाठी प्रयत्नशील असून यासाठीच पायी पदयात्रा करीत असून आपले आशीर्वाद मार्गदर्शन मिळावे अशी विनंती खासदार उन्मेश दादा पाटील यांनी प. पू. श्री. श्री रविशंकरजी यांना केली. याप्रसंगी खासदार उन्मेशदादा यांनी गिरणा वॉटर कप स्पर्धा बाबत तसेच गीरणा खोऱ्याची संपूर्ण माहिती दिली. यावेळी परम पूज्य श्री.श्री. रविशंकरजींनी जलसंधारणासोबत मनसंधारण करा. आपण गिरणा परिक्रमा करणारे युवा जलयोद्धा असल्याचे कौतुक करीत आशिर्वाद दिले.