श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची कार्यकारिणी जाहीर

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेनेची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. यावेळी नवनियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.

 

करणी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुखदेवसिंह गोगामेडी, राष्ट्रीय उपाध्यक्ष योगेंद्रसिंह कटार, आनंदसिंह ठोके,जीवनसिंह सोलंकी, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष कवरसिंह बेनाडे, प्रदेश उपाध्यक्ष दामोदर राजपूत, संदीपसिंह राजपूत, जिल्हाप्रमुख महेंद्रसिंह राजपूत व श्री राष्ट्रीय राजपूत करणी सेना पदाधिकारी यांचे नेतृत्वावर विश्वास ठेवत खान्देश विभागातील राजपूत टीमने जाहीर प्रवेश केला.

 

आगामी काळात खान्देश मधून १०१ पदाधिकारी जे सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत असे समाज बांधवांना नियुक्ती पत्र देवून संघटन वाढवून मजबूत करण्याचे आश्वासन प्रवीणसिंह पाटील यांचे नेतृत्वात खान्देश विभाग प्रमुख विलाससिंह पाटील व खान्देश कार्याध्यक्ष श्री विठ्ठल सिंह मोरे यांना दिले आहे.

 

नवीन नियुक्ती पुढील प्रमाणे

आदर्श उद्योजक व समाज भूषण प्रदेश कार्याध्यक्ष प्रवीणसिंह पाटील , महिला प्रदेश उपाध्यक्ष वैशाली सोलंकी, महाराष्ट्र खान्देश विभाग अध्यक्ष  विलास सिंह पाटील , खान्देश विभाग मार्गदर्शक मोहनसिंगजी पवार ,  खान्देश विभाग कार्याध्यक्ष  विठ्ठल सिंह मोरे, खान्देश विभाग उपाध्यक्ष महेंद्रसिंह पाटील, जळगाव जिल्हा युवा अध्यक्ष  संदीपसिंह राणा, खान्देश विभाग युवा अध्यक्ष बापूसिंह राणा, जळगाव जिल्हा कार्याध्यक्ष भगवानसिंह खंडालकर यांची निवड करण्यात आली आहे.

Protected Content