श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्थेतर्फे स्वातंत्र्यदिनानिमित्त पांडे चौकातून निघाली भव्य तिरंगा सन्मान रॅली

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त श्री क्षत्रिय शिंपी समाज हितवर्धक संस्थेच्या वतीने भव्य तिरंगा सन्मान रॅलीचे आयोजन मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी सकाळी ९ वाजता पांडे डेआरी चौक येथे करण्यात आले होते.

 

पांडे डेअरी चौकातील पंचमुखी हनुमान मंदीरापासून भव्य तिरंगा सन्मान रॅलीला सुरूवात करण्यात आली. ही रॅली पांडे डेअरी चौक, पुष्पलता बेंडाळे चौक, राजकमल टॉकीज, नेताजी सुभाष चौक, रथ चौक मार्गे शिंपी समाज सांस्कृतिक सभागृहात समारोप करण्यात आला. या  रॅलीचे मुख्य आकर्षण म्हणजे ७५ फूट असलेल्या तिरंगा तयार करण्यात आला होता. व त्याला समाजातील महिला मंडळ युवक मंडळ व समाज बांधवांनी आपल्या हातामध्ये पकडला होता, दीड  किलोमीटर रॅली काढण्यात आली होती.  ठिकठिकाणी रॅलीचे स्वागत करण्यात आले.  समाजातील उद्योजक राम जगताप,किरण व उमेश शिंपी, अशोक सोनवणे ,प्रमोद शिंपी, राकेश शिंपी, राहुल शिंपी, अमित जगताप,चार्ली शिंपी, सतिष सोनवणे, गिरीश देवरे शरदराव बिरारी या मान्यवरांनी तिरंगा रॅली वर पुष्पवृष्टी करून भव्य स्वागत केले. यावेळी पुष्पलता बेंडाळे चौक येथे राणी लक्ष्मीबाई व नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रकुमार सोनवणे, जिल्हाध्यक्ष बंडू शिंपी, उपाध्यक्ष विवेक जगताप, प्रकल्प प्रमुख मुकुंद मेटकर, सचिव अनिल खैरनार, युवकाध्यक्ष जितेंद्र शिंपी, मनोज भांडारकर, दिलीप सोनवणे, प्रदिप शिंपी, राजेंद्र बाविस्कर, सतिष  जगताप, सुरेश सोनवणे, हेमंत शिंपी यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते महिला मंडळ मोठ्या संख्येने  सहभागी होते. यावेळी भारत माता की जय, वंदे मातरम च्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. संपुर्ण देशभक्तीमय वातावरण निर्माण झाले होते. यात सजीव देखाव्या जळगावाकरांचे लक्ष वेधून घेतले होते.

Protected Content