यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील श्री व्यास धनवर्षा सहकारी बँक लिमिटेड यावल या बँकेस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील उत्कृष्ट नागरी सहकारी बँक म्हणून महाराष्ट्र राज्य अर्बन बँक असोसिएशनच्या वतीने गौरविण्यात आले.
त्यावेळी देशाचे माजी केन्द्रीय रेल्वेमंत्री व भारत सरकारच्या को-ऑपरेटिव ड्राफ्ट समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभु यांचे यांचे हस्ते पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र अर्बन बँकफेडरेशनचे अध्यक्ष अजय ब्रम्हे, महाराष्ट्र राज्य अर्बन बँक असोसिएशनचे अध्यक्ष विश्वास ठाकूर, सहकार आयुक्त अनिल कवडे तसेच सहकार भारतीचे प्रदेशाध्यक्ष डॉ.शशिताई अहिरे ह्या उपस्थीत होत्या. त्यावेळी बँकेच्या वतीने बँकेचे संचालक व व्यवस्थापक यांनी पुरस्कार स्वीकारला. सदर पुरस्कार बँकेचे विद्यमान अध्यक्ष हेमंत चौधरी यांनी बँकेचे संस्थापक अध्यक्ष कै.अण्णासाहेब अट्रावलकर व बँकेचे सर्व सभासद ठेवीदार ग्राहक यांना अर्पण केला आहे. बँकेचे सर्व संचालक व कर्मचारी वृंद यांच्या अथक परिश्रमाचे हे फळ असल्याचे सांगुन बँकेच्या या यशात चेअरमन, व्यवस्थापक व सर्व संचालक मंडळाचे विशेष योगदान आहे .